रचनाच्या माजी विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो
कोविड १९ च्या दुसऱ्या लाटेचा सामना आपला देश करतोय. सगलीकडे हाहाकार माजलाय. आपले वैद्यकिय क्षेत्र पूर्ण ताकदिनीशी लढा देतय. नागरीक म्हणून आपण काय करु शकतो ही भावना प्रत्येक संवेदनशील माणसाच्या मनात आहे. एकटे नाही पण एकत्रितपणे आपण नक्कीच मदत करु शकतो. आपला खारीचा वाटा उचलू शकतो.
आपण रचना विद्यालय माजी विद्यार्थी संस्थेमार्फ़त ‘आरोग्य रचना’ या प्रकल्पा अंतर्गत ५ लोकाभिमुख उपक्रम घेण्याचे सर्वानुमते ठरविले आहे. आपणास कल्पना आहेच की हे काम करताना आपल्याला मदतीचे हात हवे आहेत. आपले नाशिकचे अनेक मित्र मैत्रिणी वेळ देणार आहेत पण याला आर्थिक बळ देखिल हवे आहे, जेणेकरुन आपण जास्तीत जास्ती गरजुंपर्यन्त ही मदत पोहचवू शकू. आजपर्यंत आपण सर्वांनी वेळोवेळी आपल्या कामाला हातभार लावला आहे. यावेळी आपण फार मोठया संकटाचा मुकाबला करत आहोत. याला तुम्ही भरभरुन प्रतिसाद द्याल अशी आशा आहे. 
धन्यवाद.

आपला,
राहूल भावे
अध्यक्ष, रचना विद्यालय माजी विद्यार्थी संस्था

खाली उपक्रमांचा थोडक्यात आढावा आणि बँक खात्याचा तपशिल आपल्या माहितीसाठी देत आहोत,

”आरोग्य रचना”
    प्रकल्प समन्वयक: 
कौस्तुभ मेहता व चैतन्य माळी

उपक्रम १. रचना लसीकरण (सशुल्क) प्रकल्प प्रमुख: कौस्तुभ धामणे, किरण सागोरे 
(हा उपक्रम सेल्फ स्पॉन्सर्ड आहे)

उपक्रम २. रचना सामाजिक बांधिलकी (आदिवासी गावांत वैद्यकिय कीट - इम्यूनिटी सप्लिमेंट्स, मास्क आणि साबण इ.)
प्रकल्प प्रमुख: 
डॉ. स्वानंद शुक्ला
मार्गदर्शक: डॉ. शीतल बिरारी

उपक्रम ३. रचना अन्नदान 
(कोविड सेन्टर वरील लांबुन आलेल्या पेशंटच्या नातेवाईकांना जेवणाची सोय - (रोज 100 लोकांना)
प्रकल्प प्रमुख: संजय घोडके, योगेश तिडके,संदीप घुले

उपक्रम ४. रचना सेवाभाव
(कोरोना बाधीत अथवा गरजु जेष्ठ नागरिकांना किराणा, औषधे,भाजीपाला यांचा नियमीत पूरवठा)
प्रकल्प प्रमुख: अंजली बुटले

5. रचना कोविड हेल्पलाईन 
(औषधे, होस्पिटल्स, बेड्स यांची उपलब्धता याबाबत माहिती. तसेच Expert डॉक्टर्स कडुन मार्गदर्शन)
समन्वयक: संकेत आहेर,
                सई कावळे
        
बँक खाते तपशील
१. बँक ऑफ बरोडा - गंगापूर रोड ब्रांच
२. खाते नाव: 
रचना विद्यालय माजी विद्यार्थी संस्था, नाशिक.
३. खाते क्र: 27850200000713
४. आयएफएससी कोड: BARB0GANNAS (यात ओ नसून zero आहे याची नोंद घ्यावी)
५. खाते प्रकार:  "करंट"
     
टीप: पैसे ट्रान्सफर केल्या नंतर त्याची acknowledge ment आपल्या नावासह साहेबराव हेंबाडे ( सचिव र. वि.  मा. वि. संस्था)यांच्या मोबाईल नंबर वर पाठवावी. 
मो. नं 9881291999