Arogya Rachana Vaccination
काही दिवसांपूर्वी कर्णबधिर विद्यार्थ्याच्या पालकांच्या विनंती वरून रचना विद्यालय माजी विद्यार्थी संस्था , सचिव साहेबराव हेंबाडे यांच्याकडे कर्णबधिरांच्या लसीकरणाबाबत मी (अर्चना कोठावदे) मागणी केली. कारण त्यांच्या मनात लसीकरण बाबत अनेक शंका व भीती आहे. विनंती वरून साहेबराव ने लगेच संस्थेच्या लेटर हेड वर आरोग्य अधिकारी मनपा यांच्या नावाने पत्र तयार केले. त्या नुसार त्यांची अपॉइंटमेंट घेतली. त्यांना भेटून आपल्या संस्थेविषयी ,आपल्या आरोग्य रचना प्रकल्पा विषयी , दिव्यांग माजी विद्यार्थ्यांना लसीकरण कसे होईल यावर चर्चा केली . त्यानुसार होकार दर्शवून डॉ. साळुंके मॅडम उप आरोग्य अधिकारी यांना भेटावयास सांगितले त्यावर , "करून घेऊ चांगला initiative आहे." असा प्रतिसाद मिळाला . त्यासाठी एक सेन्टर आम्ही आरक्षित करण्याचा विचार करतो. त्या नंतर साळुंके मॅडम ने सकारात्मक भूमिका घेऊन संबंधित कालिदास कला दालन च्या सेन्टर शी तातडीने संपर्क साधून सहकार्य करण्यास सांगितले. त्या दिवसापासून डॉ दायमा यांचेशी आजपर्यंत साहेबराव संपर्कात होता. त्यात ही मुले18 ते 44 असल्याने त्यांचे साठी सॉफ्टवेअर अँप change साठी वरिष्ठ पातळीवर संपर्क साधून खटाटोप करावा लागला. आज त्यास यश मिळाले... आणि आपल्या दिव्यांग बांधवाना लस मिळवून देता आले.
आज 18 ते 44 वयोगटातील रचना विद्यालयाच्या 15 कर्णबधिरांना लसीकरण झाले. विद्यार्थी पालक आणि तेथील डॉ दायमा देखील खूप आनंदी झाले. त्यांच्या सर्व स्टाफ ला पण खूप आनंद मिळाला.
रचना विद्यालय माजी विद्यार्थी संस्था व साहेबराव सर्वांचे खूप खूप धन्यवाद. डॉ दायमांनी पुढे ही मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.
Words BY Mrs.Archana Kothavade